जगातील सर्वात मोठे रुबिक पझल


फोटो सौजन्य भास्कर
पूर्व इंग्लंडच्या साफोक प्रांतात राहणाऱ्या टोनी फिशर याने स्वतःचाच चार वर्षापूर्वीचा विक्रम मोडून जगातील सर्वात मोठे रुबिक पझल तयार केले आहे. त्याची नोंद गिनीज बुक मध्ये घेण्यात आली आहे. हे पझल ६ फुट ७ इंचाचे असून त्यात प्लास्टिक पाईप व रेन्फोर्स बॉक्सचा वापर केला गेला आहे.

टोनीने चार वर्षापूर्वी ५.१ फुट उंचीचे रुबिक पझल बनवून सर्वात मोठे रुबिक पझल बनविण्याचा विक्रम केला होता तो त्याने हे नवे पझल बनवून मोडला आहे. तो सांगतो पहिल्या प्रयत्नात त्याला दोन वेळा अपयश आले. लहानपणापासून तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रेमात होता आणि त्यात आपलेही नाव यावे यासाठी वेगाने पळणे, डोंगर चढणे असे काहीही करायला तयार होता.

पण प्रत्यक्षात त्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागली. कारण आत्ता तो ५४ वर्षाचा आहे. १९८० पासून तो रुबिक पझल तयार करतोय. त्याचे हे नवे भले मोठे पझल सामान्य रुबिक प्रमाणे ९० अंशात फिरते. रुबिक पझल सोडविण्याचा माणसाचा विक्रम ३.४७ सेकंदाचा आहे. पण कॅलिफोर्निया विद्यापीठाने गतवर्षी आर्टिफीशीयल इंटेलीजन्स सिस्टीम तयार केली त्याने हे रुबिक पझल १ सेकंदात सोडविले होते.

Leave a Comment