कोविड १९ पासून अजून दूर आहे हे सुंदर बेट


फोटो सौजन्य कॅच न्यूज
जगातील २०० हून अधिक देशांना करोना विषाणूने त्याच्या विळख्यात घेतले असले तरी उत्तर पॅसीफिक समुद्रातील पलाऊ हे सुंदर बेट अजूनतरी कोविड १९ पासून दूर राहिले आहे. या बेटावर १८ हजार लोकवस्ती असून येथील प्रमुख उद्योग पर्यटन हाच आहे. या बेटावर ३ हजार वर्षापूर्वी दक्षिण पूर्व आशियाई प्रवासी उतरले होते व प्रथम १६ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी या बेटाचा अधिकृत शोध लावला असे इतिहास सांगतो. १५७४ मध्ये स्पॅनिश ईस्ट इंडीजचा हे बेट हिस्सा बनले.

दुसऱ्या महायुद्धात पलाऊ आणि मारियाना या बेटांवर ताबा मिळविण्यासाठी जपान आणि अमेरिकन सैनिकात लढाई झाली होती. १९४७ मध्ये संयुक्त राज्यशासित ट्रस्ट टेरीटरी ऑफ पॅसिफिक आयलंड्समध्ये त्याचा समावेश झाला. हे बेट चारी बाजूनी समुद्राने वेढलेले आहे. तरीही त्याला कोविड १९ चा धोका आहेच. गेल्या आठवड्यात करोनाचा एक संभावित रुग्ण येथे आढळला होता मात्र त्याला त्वरित क्वारंटाइन करण्यात आले होते. या बेटावरचे सर्वात मोठे शहर कोरर मधील सुपरमार्केट मध्ये मास्क आणि सॅनीटायझर्सची कमतरता जाणवू लागल्याने येथील नागरिक घाबरले आहेत.

Leave a Comment