करोना विषयी नवी आशा बीसीजी लस


फोटो सौजन्य डेली मेल
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी उमेद संशोधकांना नजरेत आली असून त्याचा मोठा फायदा भारताला होऊ शकणार आहे. अनेक देशात राष्ट्रीय उपक्रम या नावाखाली दिली जाणारी बीसीजी (बेसिलस कामेट गुएरिन) ही लस करोनाविरुद्धच्या लढाईत मदतगार ठरू शकणार आहे असे न्युयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीच्या बायोमेडिकल सायन्स संशोधन केंद्रातील संशोधकांना दिसून आले आहे. त्याच्या मते जेथे बीसीजी लस बंधनकारक नाही त्या देशात कोविड १९ ची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे आणि ज्या देशात ही लस पूर्वीपासून दिली गेली आहे तेथे तुलनेने कोविड १९ चा प्रभाव कमी आहे.

बीसीजीची ही लस टीबी आणि श्वास आजार रोखण्यासाठी दिली जाते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात ती दिली जाते. या लसीचा सर्वात पहिला वापर १९२० मध्ये ब्राझील मध्ये केला गेला आणि त्यानंतर तेथे या लसीचा लसीकरण कार्यक्रम सुरु केला गेला. ही लस जीवाणूंशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. पण असे दिसून आले आहे की ही लस विषाणूचा हल्ला झेलण्यासाठी उपयुक्त ठरते आहे कारण ती रोगप्रतिकार शक्ती वाढवीत असल्याने विषाणूंशी माणसाचे शरीर सहज मुकाबला करू शकते.

शरीराची इम्युनिटी चांगली असेल तर कोविड १९ शी मुकाबला करता येतो असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. या संशोधनात भारताचा उल्लेख नसला तरी भारतात ही लस १९४८ मध्ये प्रथम वापरली गेली नंतर १९४९ पासून ती शाळातून दिली गेली आणि १९५१ पासून तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. १९६२ मध्ये राष्ट्रीय टीबी प्रोग्राम भारतात राबविण्यास सुरवात झाली आणि त्यात जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना ही लस दवाखान्यातच दिली जाऊ लागली. त्यामुळे आजघडीला भारताच्या ७० टक्के लोकसंख्येला ही लस दिली गेलेलीच आहे. आणि ९७ टक्के बालकांना ही लस दिली गेली आहे.

इराण मध्ये ही लस देण्याची सुरवात १९८४ मध्ये झाली त्यामुळे तेथे ३६ वर्षाखालील तरुणांना कमी पण वयोवृद्ध लोकांना कोविड १९ चा धोका जास्त आहे. अमेरिका लेबानन, नेदरलंड, बेल्जियम मध्ये ही लस दिली गेलेली नाही त्यामुळे तेथे हा धोका अधिक आहे. भारताप्रमाणे ब्राझील, जपान आणि चीनला सुद्धा हा धोका कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment