मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे 30 जूनपर्यंत राहणार वैध

लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांची परिवहन कार्यालय बंद आहेत. असा स्थिती वाहनांच्या कागदपत्रांची मुदत समाप्त झाली असणाऱ्या चालकांना रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशभरातील 23 कोटी खाजगी वाहनचालक आणि 1.2 कोटी ट्रक चालकांच्या कागदपत्रांची मुदत 31 मार्चवरून वाढवून 30 जून करण्यात आली आहे.

मोटार वाहन कायदा, 1988  आणि केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 अंतर्गत येणारी सर्व कागदत्रे जसे की, वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन फिटनेस टेस्ट, राज्य/केंद्र परमिटचे नुतनीकरण इत्यादी कागदपत्रे 30 जूनपर्यंत वैध असतील.

कागदपत्रे नसल्याने अनेक ट्रक चालकांना पोलिसांनी आडवल्याची माहिती समोर आल्यानंतर मंत्रालयाने कागदपत्रांची मुदतवाढ 30 जूनपर्यंत वाढवली आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Leave a Comment