कोरोना : रस्त्यावर झोपणाऱ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार हे सरकार

जगभरात थैमान घातलेलेल्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. असाच एक प्रयत्न म्हणून एक देश आपल्या देशातील रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार आहे.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथील असून, येथे रस्त्यावर झोपणाऱ्या व्यक्तींना एक रात्रीचे भाडे 20 हजार रुपये असणाऱ्या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील सरकार या प्रोजेक्टला सुरू करण्याची तयारी करत आहे. यामुळे रस्त्यावर राहणाऱ्यांचा कोरोना व्हायरसपासून बचाव होईल.

या प्रोजेक्टंतर्गत एक महिना रस्त्यावर झोपणाऱ्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. सुरूवातील 20 बेघर लोकांना पॅन पॅसिफिक हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.

प्रोजेक्टला हॉटेल्स विद हार्ट नाव देण्यात आलेले आहे. जे लोक स्वतःला आयसोलेट करू शकले नाहीत, अशांची निवड केली जाईल. त्यानंतर घरगुती हिंसेला बळी पडलेल्या महिला आणि मानसिक आरोग्याशी लढणारे लोक येथे राहतील. यासाठी हॉटेलच्या 20 खोल्या वापरल्या जातील.

Leave a Comment