या गावातील प्रत्येक कुत्रा आहे कोट्याधीश

एखादी व्यक्ती कोट्यावधी किंमत असलेल्या जमिनीची मालक असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मात्र कधी कुत्रा एखाद्या जमिनीचा मालक आहे  असे ऐकले आहे का ? नाही ना. मात्र गुजरातमध्ये एका गावातील सर्व कुत्रे कोट्याधीश आहेत. हे कुत्रे पंचोट गावात ट्रस्टच्या नावाने असलेल्या जमिनीद्वारे कोट्यावधी रुपये कमवतात.

गुजरात येथे जेव्हापासून मेहसाणा बायपास झाला आहे, तेव्हापासून येथील जमिनीचे भाव आकाशाला टेकले आहेत व याचा सर्वाधिक फायदा गावातील कुत्र्यांना झाला आहे.

गावातील एक ट्रस्ट ‘मढ़ नी पती कुतरिया ट्रस्ट’कडे जवळपास 5 एकर जमीन आहे. या जमिनीपासून होणारी सर्व कमाई कुत्र्यांच्या नावे केली जाते. या जमिनीची किंमत जवळपास 3.5 कोटी रुपये प्रती बिघा (4 बिघा म्हणजे 1 एकर) आहे. ट्रस्टकडे जवळपास 70 कुत्रे आहेत. या प्रकारे प्रत्येक कुत्र्याच्या वाट्याला 1-1 कोटी रुपये सहज येतात.

ट्रस्टचे अध्यक्ष घगनभाई पटेल यांच्यानुसार, कुत्र्यांना त्यांचा वाटा देण्याची परंपार गावाच्या शतकांपुर्वीच्या ‘जीवदया’ प्रथेत सापडते. ही परंपरा श्रींमतांनी दान केलेल्या लहान-लहान जमिनीच्या तुकड्यांपासून झाली. शेतकऱ्यांचा एक गट या जमिनींची 70-80 वर्षांपासून काळजी घेत आहे.

गावाच्या विकासासोबत जमिनीचे देखील भाव वाढले. जी जमीन दान करण्यात आली होती, त्याचे कोणतेही कागदपत्र नाहीत. या जमिनीद्वारे होणाऱ्या कमाईचा उपयोग गावातील कुत्रे व अन्य प्राणी, पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी केल जातो.

जमिनीचे भाव वाढल्यानंतर देखील कोणीही दान केलेली जमीन परत मागण्यास आले नाही. दरवर्षी शेती करण्यासाठी जमिनीच्या एका प्लॉटचा लिलाव केला जातो. सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती त्या जमिनीवर पीक घेऊ शकतो.

लिलावातून जवळपास 1 लाख रुपये कमाई होते. जी कुत्र्यांसाठी खर्च केली जाते. ट्रस्टला दरवर्षी 500 किलो धान्य मिळते. याशिवाय गाईंच्या उपचारासाठी एक वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.

Leave a Comment