कोरोना : फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवला ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा व्हिडीओ

फेसबुक आणि इंस्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवरून ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांचा व्हिडीओ हटवला आहे. कोव्हिड-19 बाबत चुकीची माहिती दिल्याचे कारण सांगत हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. याआधी ट्विटरने देखील बोल्सोनारो यांचा व्हिडीओ हटवला होता.

फेसबुकने म्हटले आहे की, आमच्या अटींचे उल्लंघन करणारा कंटेट आम्ही फेसबुक व इंस्टाग्रामवरून हटवला आहे. लोकांना शारीरिक नुकसान पोहचेल अशा गोष्टींना आमचे नियम परवानगी देत नाहीत.

ट्विटरने देखील बोल्सोनारो यांचा व्हिडीओ हटवताना हेच कारण दिले होते.

व्हिडीओमध्ये दिसत होते की, बोल्सोनारो सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत ब्राझिलाय येथे आपल्या समर्थकांमध्ये मिसळले व त्यांना अर्थव्यवस्था सुरळित सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

तर दुसरीकडे ब्राझीलचे आरोग्य मंत्री लुइझ हेनर्रीक्यू मेनदेता यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगवर जोर दिला आहे.

Leave a Comment