लॉकडाऊन : एअरटेलने 8 कोटी ग्राहकांना दिली मोठी भेट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात मोबाईल युजर्सला अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी एअरटेलने आपल्या 8 कोटी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे.

कंपनीने लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर आपल्य प्रीपेड ग्राहकांच्या प्लॅनचा कालावधी वाढवला आहे. कंपनीने 8 कोटी ग्राहकांच्या प्लॅनचा कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. सोबतच कंपनी ग्राहकांच्या फोन नंबरवर 10 रुपयांचा टॉकटाईम देखील जमा करणार आहे.

कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी शास्वत शर्मा यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहता यावे यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

ट्रायने सर्व कंपन्यांना लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विना अडथळा सेवा देण्यात यावी असे सांगितले होते. बीएसएनएल आणि एमटीएनएलने देखील आपल्या सर्व प्रीपेड धारकांच्या प्लॅनचा कालावधी 20 एप्रिलपर्यंत वाढवला असून, सर्वांच्या मोबोईलवर 10 रुपये टॉकटाईम जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment