सुवर्णपदक विजेती गोलकीपर डॉक्टर करतेय करोना रुग्ण सेवा


लंडन ऑलिम्पिक २०१२ ची सुवर्णपदक विजेती नेदरलंड हॉकी टीमची गोलकीपर जोयसे सोम्ब्रोएक कोविड १९ विरुध्दच्या लढाईत उतरली असून ही डॉक्टर खेळाडू करोना रुग्णांच्या सेवेत अहोरात्र काम करते आहे. जोयसेच्या टीमने २०१४ ची विश्वचषक चँपियनशिप सुद्धा मिळविली आहे. विशेष म्हणजे जोयसे सातत्याने सर्वश्रेष्ठ गोलकीपर ठरली आहे.

२६ व्या वर्षीच हॉकी संन्यास घेऊन जोयसेने अॅमस्टरडॅम येथून वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. २०१० ते १६ या काळात नेदरलँड्ससाठी तिने ११७ सामने खेळले आहेत. एफआयएच वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने दोन वर्षे इंटरनल मेडिसिन, पल्मोनरी, कार्डीऑलॉजी, गॅस्ट्रो इंटेस्टीनल विभागात कामाचा अनुभव घेतला आणि आयसीयु मध्येही काम केले आहे. आता ती करोना रुग्णांची देखभाल आणि औषधोपचार करण्यात मग्न आहे.

टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलले गेले त्यासंदर्भात बोलताना ती म्हणाली, हा निर्णय घेणे अवघड होते पण स्थगितीचा निर्णय योग्यच आहे. हॉकीचा निरोप घेताना तिलाही खूप जड गेल्याचे सांगून ती म्हणते, मला वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती आणि हॉकी संन्यास घेतल्याशिवाय ते सोपे झाले नसते.

Leave a Comment