कोरोनाग्रस्त महिलेने दिला जुळ्यांना जन्म, नाव ठेवले ‘कोरोना-व्हायरस’

मेक्सिको येथील एका कोरोनाग्रस्त महिलेने जुळ्यांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. 34 वर्षीय एनामारिया जोस रॅपाइल गोंजालेझ असे महिलेचे नाव असून, तिने मेक्सिको सिटीच्या जनरल ला व्हिला या हॉस्पिटलमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला.

आपल्या बाळांना देखील या महिलेने खास नाव दिले आहे. महिलेने मुलीचे नाव कोरोना जोस मिगुएल गोंजालेझ आणि मुलाचे नाव व्हायरस जोस मिगुएल गोंजालेझ असे ठेवले आहे.

गोंजालेझ म्हणाली की, मी कोणत्याही नावांचा विचार केला नव्हता. मात्र एका डॉक्टरने सुचवले की मी कोव्हिड-19 ने ग्रस्त असल्याने त्यांची नावे कोरोना आणि व्हायरस ठेवावीत. मलाही ती कल्पना आवडली.

डॉ. एड्युर्डो कास्टिल्लास म्हणाले की, मी एक जोक म्हणून ही नावे सुचवली होती. मात्र तिने हे खूपच गंभीरपणे घेतले. आई व दोन्ही बाळ निरोगी आहेत.

महिला पुढील आठवड्यात अमेरिकेत बाळांना जन्म देणार होती. जेणेकरून तिच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकेल. मात्र त्या आधीच महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या.

Leave a Comment