लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक आपआपल्या घरात लॉकडाऊन आहेत. त्यामुळे लोक घरातच व्यायाम करत आहेत. दुबई येथील एका जोडप्याने असेच केले आहे.

दुबई येथील 41 वर्षीय कोलिन एलन यांनी पत्नी हिल्डासह आपल्याच अपार्टमेंटमध्ये 20 मीटर लांब बाल्कनीमध्ये 42.2 किमीची मॅरोथॉन पुर्ण करण्याची कामगिरी केली आहे. यासाठी दोघांनी बाल्कनीमध्ये 2,100 फेऱ्या मारल्या.

याबाबतची माहिती या जोडप्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली. त्यांच्या 10 वर्षीय मुलीने देखील यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे जोडपे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहे. या मॅरोथॉनचे त्यांनी ऑनलाईन स्ट्रिमिंग देखील केले. जोडप्याने 42.2 किमी अंतर पुर्ण करण्यासाठी 5 तास 9 मिनिटे आणि 39 सेंकदांचा वेळ घेतला.

या मॅरोथॉनमध्ये जोडप्याची 10 वर्षीय मुलगी जीनाने रेस डायरेक्टरची भूमिका निभावली. तिने स्टार्ट आणि फिरण्याचे चिन्ह तयार केले. याशिवाय मॅरोथॉन दरम्यान आपल्या पालकांना पाणी आणि स्नॅक्स दिले.

एलिनने सांगितले की, ते एक मोठी, ग्लोबल आणि एक्सक्लुझिव्ह शर्यतचे आयोजन करण्याची योजना बनवत आहेत. जेथे लॉकडाऊन दरम्यान देखील लोक सोबत धावू शकतील. असा इव्हेंट लोकांना कोरोना व्हायरससंबंधी काळजी दूर करून लोकांना एकत्र आणेल.

Leave a Comment