अनेकजण व्यवहारासाठी एटीएम कार्डचा वापर करतात. जवळ रोख रक्कम बाळगण्याऐवजी कार्ड जवळ असणे अधिक फायदेशीर ठरते व वेळ देखील वाचतो. मात्र हे कार्ड हरवल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कार्ड हरवल्यास घरी बसल्या बसल्या देखील तुम्ही ब्लॉक करू शकता.
एटीएम कार्ड हरवल्यास असे करा ब्लॉक

घरूनच एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुमचे इंटरनेट बँकिंग चालू असणे गरजेचे आहे. इंटरनेट बँकिंग चालू असल्यास, ते लॉग इन करावे.

यानंतर एटीएम सर्व्हिसमध्ये जाऊन ब्लॉक एटीएम कार्डचा पर्याय निवडावा. येथे तुमच्या एटीएम कार्डची माहिती दिसेल.

एटीएम कार्ड निवडल्यानंतर त्या संबंधी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यानंतर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकल्यावर तुमचे कार्ड ब्लॉक होईल.

एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला एक कंफर्मेशन देखील मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही बँकेला ई-मेल पाठवून देखील कार्ड ब्लॉक करू शकता.
