कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या दिवसापासूनच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, नागरिक अत्यावश्य वस्तूंचा साठा करून ठेवत आहे व दुकानांबाहेर गर्दी करत आहेत.
आता एवढ्या दिवसांच्या अंतरानेच करता येणार गॅस बुकिंग
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देखील लोकांना घाबरून जाऊन गॅस सिलेंडर बुक न करण्याचे आवाहन केले होते. मात्र लोकांनी या आवाहनला प्रतिसाद न दिल्याने कंपनीने बुकिंगसाठी निश्चित कालावधी ठरवला आहे.
.@ChairmanIOCL speaks about enough stock of petrol, diesel and LPG in the country. IndianOil locations, dealers and distributors are fully operational. Watch the video for more information. #StayHomeStay #COVID2019india #CoronaStopKaroNa @dpradhanbjp @PetroleumMin pic.twitter.com/GHnaiPwFNu
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) March 29, 2020
याआधी घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांच सक्ती नव्हती. मात्र आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने निर्णय घेतला आहे की, 15 दिवसांच्या अंतरानेच घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग करता येईल.
कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी देखील नागरिकांना या परिस्थिती घाबरू नये, ही सेवा विना अडथळ्याशिवाय सुरू राहील. असे व्हिडीओमार्फत सांगितले. तसेच देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.