प्रिन्स हॅरी, मेगन यांनी स्वतः सुरक्षेचा खर्च उचलावा – ट्रम्प

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल हे दोघेही कॅनडावरून आता अमेरिकाला राहण्यास जाणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च कोण उचलणार हा प्रश्न आहे. मात्र यासंबंधी आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे.

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल अमेरिकेत राहणार असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिका खर्च उचलणार नाही. त्यांनी स्वतः स्वतःच्या सुरक्षेचा खर्च उचलावा, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.

ट्रम्प यांनी ट्विट केले की, मी ब्रिटन आणि त्यांची महाराणींचा चांगला मित्र आणि प्रशंसक आहे. शाही कुटुंब सोडलेले हॅरी आणि मेगन हे कॅनडात राहतील, असे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडले आहे. अमेरिका त्यांच्या सुरक्षेचा खर्च उलणार नाही. त्यांनी सुरक्षेचा खर्च स्वतः उचलावा.

या वर्षीच्या सुरुवातीला या शाही जोडप्याने राजघराण्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते कॅनडामध्ये राहत होते.

Leave a Comment