चीनी वैज्ञानिकांनी शोधले करोना विषाणू शोषून नाश करणारे मटेरिअल


फोटो सौजन्य डीएनए
ग्लोबल टाईम्सने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये चीनी वैज्ञानिकांनी करोनाचा निपटारा करणारे एक मटेरिअल तयार केल्याचा दावा केला गेला आहे. हे औषध नाही किंवा एखादे संयुंग सुद्धा नाही. हे एक प्रकारचे नॅनो मटेरिअल आहे. हे मटेरियल करोना विषाणू शोषून घेते आणि त्याचा नाश करते असे सांगितले जात असून यात ९६.५ ते ९९ टक्के विषाणू नष्ट होतात असा दावा केला गेला आहे.

हे मटेरिअल अचूक पद्धतीने करोना विषाणू शोषून त्याला निष्प्रभ करते असा संशोधकांचा दावा आहे. इन्शुलेशन, ल्युब्रिकंट अॅडीटीव्ह पासून अनेक उत्पादनात नॅनो मटेरियलचा वापर केला जातो. त्याच प्रमाणे कॅन्सरसारख्या रोगात सुद्धा हे नॅनो पार्टिकल वापरले जातात. आरोग्य क्षेत्रात अनेक नॅनो एन्झाइम्सचे प्रयोग केले जात आहेत असे अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने यापूर्वीच जाहीर केले होते.

मात्र नव्याने शोधल्या गेलेल्या नॅनो मटेरियलचा लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण यावर काही दुष्परिणाम होतो का याच्या अनेक चाचण्या कराव्या लागतील असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. खास प्रकारे नॅनो पार्टीकल तयार केले तर ते फायदेशीर ठरू शकतात असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment