क्वारंटाईन, येथून आला आणि यावेळी वापरला गेला हा शब्द


फोटो सौजन्य अँँडोलु एजन्सी
क्वारंटाईन हा शब्द आज जगभरातील बहुतेक लोकांच्या जिभेवर सतत येत असलेला शब्द बनला आहे. पण अनेकांना अजूनही त्याचा अर्थ माहिती नाही किंवा हा शब्द कुठून आला आणि प्रथम कधी वापरला गेला याचीही माहिती अनेकांना नाही. ज्यांच्यापासून काही आजार पसरण्याची भीती आहे अश्या रुग्णांना एका जागी बंद करून कुणालाही त्यांच्या संपर्कात येऊ न देणे हा या शब्दाचा अर्थ. तसेच या लोकांना त्या जागेतून बाहेर पडू नं देणे हेही त्यात आले. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होणारा संसर्ग होऊ नये यासाठी घेतली गेलेली काळजी हाही अर्थ त्यात अभिप्रेत आहे. यालाच आयसोलेशन किंवा कॉर्डन सेनीटायर असेही म्हटले जाते. यात एका ठराविक सीमेच्या आतच राहण्याची परवानगी असते.

विशेष म्हणजे केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही क्वारंटाईन केले जाते. हा शब्द व्हेनिशियन भाषेतील असून त्याचा अर्थ आहे चाळीस दिवस. १३४८ ते ५९ दरम्यात प्लेग मुळे युरोपातील ३० टक्के लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर क्राएशीयाने त्यांच्या किनाऱ्यावर आलेल्या जहाजातील लोकांना एका बेटावर ३० दिवस वेगळे ठेऊन त्यांच्यात प्लेगची लक्षणे दिसतात काय याचे निरीक्षण केले होते. त्यावेळी या ३० दिवस वेगळे ठेवण्याच्या काळाला ट्रेनटाईन म्हटले गेले होते. हा कालावधी नंतर ४० दिवसांच्या केला गेला आणि त्याला क्वारंटाईन म्हटले गेले.

४० दिवस हा वेगळे ठेवण्याचा काळ त्यावेळी खुपच फायदेशीर ठरला आणि प्लेगवर काबू मिळविण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. ७ व्या शतकात एका पुस्तकात या शब्दचा उल्लेख आहे. १८३८ च्या काही इस्लामिक कागदपत्रात या शब्दाचा वापर केला गेला आहे. त्यावेळी महारोगी असे वेगळे ठेवले जात होते. युरोप मध्ये १४९२ पासून महारोगासाठी वेगळे ठेवण्याची प्रथा होती तसेच १९ व्या शतकातील प्लेग, स्पेन मधला यलो फिव्हर, १८३१ मधला हैता रोखण्यात क्वारंटाईन पद्धतच वापरली गेली होती.

Leave a Comment