इटलीतील युगेनियोने कोरोनामुक्ती करून जगापुढे ठेवला आदर्श


फोटो सौजन्य जागरण
जगभरात ३२ हजारांवर प्राण घेणाऱ्या कोविड १९चा मोठा फटका इटलीला बसला असून येथे १० हजारापेक्षा अधिक मृत्यू या विषाणूमुळे झाले आहेत. संपूर्ण इटली लॉकडाऊन असताना इटलीतील एका शहराने मात्र जगापुढे आदर्श निर्माण केला आहे. युगेनियो (Vo Eeuganeo) या शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. उत्तर इटलीतील पाऊआ प्रांतात असलेले सुमारे अडीच लाख वस्तीचे हे शहर व्हेनिसशी साम्य असलेले सुंदर शहर आहे.

या शहरातही करोनाची लागण झाली होती आणि एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यूही झाला पण त्यानंतर प्रशासनाने अतिशय जलद निर्णय घेऊन कठोर अंमलबजावणी केली आणि नागरिकांना घरातच बंद केले गेले. याबाबत द.कोरियाचाच फॉर्म्युला या शहराने वापरला. लाईव्ह सायन्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हे शहर २१ फेब्रुवारी रोजी जगात चर्चेत आले ते एका व्यक्तीचा येथे कोविड १९ने मृत्यू झाल्याने. मात्र २३ फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने ९७ टक्के नागरिकांच्या टेस्ट केल्या आणि त्यात ३ टक्के लोकांना करोना संसर्ग असल्याचे दिसून आले. त्या लोकांना घरातच बंद केले गेले आणि जे गंभीर होते त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. याचवेळी करोनाची लागण न झालेल्यानाही घराबाहेर पडू दिले गेले नाही.

६ ते ८ मार्च या काळत पुन्हा एकदा नागरिकांच्या टेस्ट केल्या गेल्या त्यात १ टक्का नागरिक पोझिटिव्ह होते. त्यानंतर शेवटचा पेशंट बरा होईपर्यंत लोकांना क्वारंटाईन केले गेले आणि २३ मार्चला या शहरात एकही करोना संसर्ग व्यक्ती नसल्याचे जाहीर केले गेले.

Leave a Comment