तळीरामांच्या सोयीसाठी या अभिनेत्याचे सरकारला साकडे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. दारूची दुकाने देखील बंद असल्याने, तळीराम अस्वस्थ झाले आहेत. आता एका अभिनेत्याने चक्क दारूची दुकाने सुरू करण्याचे आवाहन सर्व राज्य सरकारला केले आहे.

अभिनेते ऋषि कपूर गेली काही दिवसांपासून आपल्या ट्विटमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी सर्व राज्य सरकारला दारूची दुकाने सुरू करण्याचे आवाहन करत ट्विट केले आहे.

ऋषि कपूर यांनी ट्विट केले की, सर्व राज्य सरकारने संध्याकाळच्या वेळी दारूची दुकाने उघडावी. मला चुकीचे समजू नका. लॉकडाऊनमुळे लोक घरात बसून डिप्रेशनमध्ये जगण्यास मजबूर आहे. या काळात डॉक्टर आणि पोलिसांना देखील तणावापासून मुक्ती पाहिजे. असेही, ब्लॅकमध्ये प्रत्येक ठिकाणी दारूची विक्री सुरूच आहे.

ऋषि कपूर यांच्या या ट्विटनंतर आता सोशल नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.

Leave a Comment