फॅक्ट चेक : खरचं मोदी देत आहेत का 400 रुपये टॉकटाईम ?

कोरोना व्हायरसमुळे लोकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. त्यामुळे मोबाईलवर मेसेजद्वारे जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात राहत आहेत. मात्र यासोबतच फेक मेसेज देखील मोठ्या प्रमाणात पसरवले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटी योजनेच्या यशामुळे 400 रुपये टॉकटाईम देत आहेत, असा एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे.

Image Credited – Amarujala

व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, हा मेसेज तीन ग्रुपवर शेअर केल्यानंतर 5 मिनिटांनी तुमचे बॅलेंस चेक करा, तुम्हाला 400 रुपये मिळतील.

अमरउजालाने केलेल्या फॅक्ट चेकनुसार, या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी गुगलची मदत घेतली असता, पंतप्रधान मोदींचे नाव वापरून पसरवण्यात आलेले अनेक फेक मेसेज समोर आले. याशिवाय 400 रुपये मिळणारा हा मेसेज चेक फॉर स्पॅम नावाच्या वेबसाईटवर मिळाला. जेथे हा मेसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले.

अर्थात, असे फॉरवर्ड करून बॅलेन्स येणारे सर्व मेजेस फेक असतात. त्यामुळे 400 रुपये मिळणारा हा मेसेज देखील फेक आहे.

Leave a Comment