मोदींच्या ‘लॉकडाऊन’ संबोधनाने मोडले टिव्हीचे सर्व रेकॉर्ड

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन करताना लॉकडाऊनची घोषणा केली होती. मोदींच्या या संबोधनाने टिव्हीवरील प्रसारित मागील सर्व संबोधनांचे विक्रम मोडले आहे. बार्क इंडिया रेटिंग्सने या संदर्भातील माहिती दिली आहे.

टिव्ही रेटिंग एंजेसी बार्क इंडियानुसार, रेटिंगमध्ये मोदींच्या लॉकडाऊन संबोधनाला त्यांच्या मागील जनता कर्फ्यू आणि नोटबंदीच्या सर्व संबोधनापेक्षा सर्वाधिक पाहण्यात आले.

प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विट केले की, बार्क इंडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या डाटानुसार, 24 मार्चला लॉकडाऊनच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणाला टिव्हीवर सर्वाधिक पाहण्यात आले. याने आयपीएलच्या फायनल मॅच पाहणाऱ्या संख्येला देखील मागे टाकले आहे. हे संबोधन 201 पेक्षा अधिक चॅनेलवर दाखवण्यात आले आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याला 13.3 कोटी लोकांनी पाहिले होते. तर मोदींच्या संबोधनाला 19.7 कोटी लोकांनी पाहिले.

बार्क रेटिंगनुसार, पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूच्या संबोधनाला 191 टिव्ही चॅनेलवर 8.30 कोटी लोकांनी पाहिले. मागील वर्षी 8 ऑगस्टला कलम 370 रद्द करण्याच्या भाषणाला 163 चॅनेलवर 6.5 कोटी प्रेक्षकांनी पाहिले होते. तर नोटबंदीच्या संबोधनाला 114 चॅनेलवर 5.7 कोटी लोकांनी पाहिले होते.

Leave a Comment