‘शिंका आणि व्हायरस पसरवा’, पोस्टमुळे इन्फोसिसचा कर्मचारी अटक

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे व घराच्या बाहेर निघणे देखील टाळत आहे. मात्र कोरोना व्हायरसबाबत पोस्ट केल्याने बंगळुरू येथील आयटी कंपनी इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याला अटक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये व्हायरसचा प्रसार करण्यासाठी भडकवल्याबद्दल त्याला अटक करण्यात आले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘चला… सोबत येऊया, बाहेर पडू, उघड्यावर शिंकू आणि व्हायरस पसरवू.’

या प्रकरणाबाबत बाबत इन्फोसिसने ट्विट करत देखील माहिती दिली.कंपनीने स्पष्ट केले की, त्यांना आपल्या तपासात कर्मचारी दोषी असल्याचे आढळले व त्यांनी आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकले आहे.

Leave a Comment