स्मार्ट स्पीकर वापरताना ही घ्या काळजी

कोरोना व्हायरसमुळे जर तुम्ही घरून काम करत असाल, तर घरातील स्मार्ट स्पीकर जसे की अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा त्वरित बंद करा. कारण अ‍ॅलेक्सा सारखे स्मार्ट डिव्हाईस तुमचे बोलणे ऐकत आहे.

या डिव्हाईसबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. यात व्यावसायिक आणि वकिलांना सल्ला दिला आहे की बिझनेस कॉल आणि गोपनीय प्रकरणाबाबत चर्चा करताना या डिव्हाईसला बंद करावे. अन्यथा तुमचे बोलणे रेकॉर्ड होऊ शकते व यामुळे तुमची खाजगी माहिती लीक होण्याचा धोका वाढतो.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, विशेषज्ञांनी उद्योगपती आणि वकिलांनी फोनवर महत्त्वाची चर्चा करताना या डिव्हाईसला बंद करावे. तर दुसरीकडे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अ‍ॅलेक्सा आणि गुगलचे स्मार्ट स्पीकर आपोआप सुरू होतात व दिवसाला कमीत कमी 19 वेळा युजर्सचे बोलणे रेकॉर्ड करतात.

Leave a Comment