चीनच्या या तंत्रज्ञानाचा वापर करून भारत करू शकतो कोरोनावर मात

चीनमधून सुरूवात झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. मात्र आता चीनला या व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी चीनने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला. भारत देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाला मात देऊ शकतो. या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

कलर कोडिंग –

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी चीनने सर्वात प्रथम कलर कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानासाठी अलीबाबा आणि टेनसेंट यांनी भागिदारी केली आहे. हे सिस्टम स्मार्टफोन अ‍ॅपच्या रुपात काम करते व यात युजर्सला त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीनुसार हिरवी, पिवळी आणि लाल रंगाचे क्यूआर कोड दिले जाते.

या सिस्टमसाठी चीन सरकारने चेकप्वाइंट्स बनवले आहेत. जेथे लोकांचे चेकिंग होते. कलर कोडनुसार लोकांना सार्वजनिक ठिकाणी जायचे की घरात क्वारंटाईनमध्ये राहायचे हे सांगितले जाते.

हिरवा कोड असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास परवानगी असते. लाल रंग असेल तर घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागते. या सिस्टमचा वापर चीनमधील 200 शहरांमध्ये केला जात आहे.

Image Credited – Amarujala

रोबोटिक्स –

चीनने कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी रोबॉटचा देखील वापर केला. हे रोबॉट हॉटेलपासून ते ऑफिसपर्यंत साफ-सफाईचे काम करतात. याशिवाय आजुबाजूच्या परिसरात सॅनिटायझरची देखील फवारणी करतात. मेडिकल सॅम्पल पाठवण्यासाठी देखील या रोबॉटचा वापर केला जात आहे.

Image Credited – Amarujala

ड्रोन्स –

ड्रोन्सद्वारे चीनच्या सरकारने लोकांना फेस मास्क आणि औषधे पोहचवली. या डिव्हाईसद्वारे कोरोना व्हायरसद्वारे संक्रमित भागात सॅनिटायझरची फवारणी केली.

Image Credited – Amarujala

फेशियल रिकॉग्निशन सिस्टम –

कोरोना व्हायरसला ट्रॅक करण्यासाठी चीनने फेशियल रिकॉग्निशन सिस्टमचा वापर केला. या सिस्टममध्ये इंफ्रारेड डिटेक्शन तंत्रज्ञान आहे. जे लोकांच्या शरीरातील तापमान जाणून घेण्यास मदत करते. याशिवाय कोणी मास्क घातला आहे की नाही हे देखील ही सिस्टम सांगते. याशिवाय चीनच्या सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील उपयोग केला.

Leave a Comment