लॉकडाऊन : कार एकाच जाग्यावर उभी असल्याने होऊ शकते समस्या, अशी घ्या काळजी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशव्यापी 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. अशा परिस्थितीमध्ये वाहन 21 दिवस एकाच ठिकाण असेल व त्याचा वापर होणार नाही. त्यामुळे या दिवसात तुमच्या कारची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

कारची बॅटरी –

दीर्घकाळ गाडी सुरू न केल्यास कारच्या बॅटरीची समस्या निर्माण होते. बॅटरीचे काम तुमची गाडी स्टार्ट करण्याचे असते. गाडीचा वापर न केल्यामुळे बॅटरी डाउन होते व गाडी सुरू होणार नाही. यासाठी गाडीला प्रत्येकी 3-4 दिवसांनी स्टार्ट करावे. यामुळे बॅटरी खराब होणार नाही.

बॅटरीची तार काढणे –

तुम्ही कारच्या बॅटरीला डिस्कनेक्ट देखील करू शकता. यासाठी कारचे बोनेट उघडून, त्याच्या टर्मनिलला ढिले करून बॅटरीचे कनेक्शन काढून टाका. जेव्हा कार वापरायची असेल, त्यावेळी पुन्हा वापरा. मात्र असे वारंवार केल्याने बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

ब्रेक होऊ शकतात जाम –

दीर्घकाळ गाडी चालू न केल्याने ब्रेकची देखील समस्या निर्माण होते. कारचे हँडब्रेक लावून दिर्घकाळ तसेच ठेवल्यास ब्रेक पॅड जाम होतात. त्यामुळे अनेक दिवसांसाठी गाडी लावत असाल तर हँडब्रेक लावू नये. कारला गिअर अथवा पार्क मोडमध्ये सोडून द्यावे.

कारला झाकावे –

कारला इनडोरमध्ये पार्क करावे. जर एखाद्या कारणामुळे कार बाहेर लावावी लागत असेल, तर कारला नक्की कव्हरने झाकावे.

कारचे इंटेरियर ठेवा स्वच्छ –

कार पार्क करण्याआधी कारच्या इंटेरियरला नक्की स्वच्छ करा. पार्क करण्याआधी कॅबिनमध्ये एखादे फूड अथवा अन्न तर पडल्याले नाही, हे तपासा.

टायर प्लॅट होण्यापासून वाचवा –

जर गाडी 1 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस एकाच जागेवर उभी असेल तर गाडीला थोडे पुढे मागे करावे. जेणेकरून टायरमध्ये प्लॅट स्पॉट पडणार नाही.

Leave a Comment