या अ‍ॅपद्वारे 12 लोक एकसोबत करू शकणार व्हिडीओ कॉलिंग

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्क साधण्याचे एकमेव माध्यम हे मोबाईल आहे. यामुळे आता गुगलने आपले अ‍ॅप ड्युओमध्ये मोठा बदल केला आहे.

आता गुगलच्या ड्युओ अ‍ॅपद्वारे एकाच वेळी 12 जण व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. याआधी अ‍ॅपद्वारे एकसोबत 8 जण व्हिडीओ कॉलिंग करू शकत होते. या संदर्भात गुगलच्या प्रोडक्ट अँड डिझाईनच्या वरिष्ठ संचालक सनाज अहारी यांनी ट्विटरवर माहिती दिली.

गुगलच्या प्रोडक्ट अँड डिझाईनच्या वरिष्ठ संचालक सनाज अहारी यांनी ट्विट करत माहिती दिली की, या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या लोकांना भेटायचे आहे. त्यामुळे आम्ही ड्युओ अ‍ॅपमधील ग्रुप व्हिडीओ कॉलरची संख्या 8 वरून 12 केली आहे.

या फीचरसाठी युजर्सला कोणतीही मॅन्युअल सेटिंग करावी लागणार नाही. युजर थेट 12 जणांना व्हिडीओ कॉल करू शकतात. युजर थेट 11 जणांना अ‍ॅड करून कॉलिंग करू शकतात.

Leave a Comment