जेम्स बॉंडच्या बंदुका चोरट्यांनी पळविल्या


फोटो सौजन्य वर्ल्ड न्यूज
००७ जेम्स बॉंड चित्रपटात वापरल्या गेलेल्या पाच बंदुका चोरट्यांनी पळविल्या असल्याचे ब्रिटीश पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. उत्तर लंडन भागातील एका इमारतीत या बंदुका ठेवल्या गेल्या होत्या. या बंदुकांची आजच्या भावाने बाजारातील किंमत १ लाख पौंड म्हणजे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या सर्व बंदुका डीअॅक्टीव्ह असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चोरीस गेलेल्या बंदुकात डाय अदर डे चित्रपटात वापरली गेलेली बेरीटा चिता पिस्तोल, एक लेझर/ सायलेन्सर अॅटॅचमेंट व १ लामा २२ सह बेरेटा टॉमकॉट पिस्तुल आहे. जेम्स बॉंड सिरीज ए व्ह्यू टू ए किल मध्ये वापरलेल्या वॉल्टर पीपीके बंदूक, लिव्ह अँड लेट डाय मध्ये वापरलेले स्मिथ अँड वेस्टन ४४ मॅग्नम रिव्होल्व्हर यांचाही चोरीला गेलेल्या बंदुकात समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे रीवोल्व्हर असे एकमेव आहे ज्यात त्याचे पूर्ण फिनिशिंग क्रोम मध्ये केले गेले आहे. त्याला साडेसहा इंचाचे बॅरल आणि लाकडी मुठ आहे.

Leave a Comment