कोविड १९ चा फोटो घेण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
जगभर लोकांचे प्राण घेत सुटलेला करोना कोविड १९ विषाणू प्रत्यक्षात दिसतो कसा हे शोधण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. वैज्ञानिकांनी SARS- COV-2 म्हणजेच कोविड १९ चे मायक्रोस्कोप मधून फोटो घेण्यात यश मिळविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतात कोविड १९ चा प्रवेश सर्वप्रथम ३० जानेवारीला केरळ मध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून झाला होता. याच व्यक्तीच्या घशातून करोनाचे सँपल वैज्ञानिकांनी घेतले होते. त्याचे मायक्रोस्कोप मधून फोटो घेऊन त्यावर केलेले संशोधन आणि संशोधनाचे परिणाम इंडियन जर्नल ऑफ मेडिसिन रिसर्च मधून प्रसिद्ध केले गेले आहेत असे समजते. कोविड १९ वर अजून उपचार मिळालेला नाही पण त्याचे फोटो आणि नवीन संशोधन यातून उपचाराची दिशा नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment