अरेच्चा ! येथे चक्क करतात वटवाघळांची पुजा

अनेक ठिकाणी वटवाघळांना अशुभ मानले जाते. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे कारण देखील वटवाघूळ असल्याचे मानले जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतातील एका गावात लोक वटवाघळांची पूजा करतात. येथील लोकांना विश्वास आहे की, ग्राम देवतेप्रमाणेच वटवाघूळ रक्षा करते व येणाऱ्या आपत्तीपासून वाचवते.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात असे एक मंदिर आहे, जेथ वटवाघळाची पुजा केली जाते. येथील लोक वटवाघळांना संपन्नतेचे प्रतिक मानतात. लोकांचा विश्वास आहे की, जेथे वटवाघूळ राहतात, तेथे कधीच संपत्तीची कमतरता जाणवत नाही. वैशाली जिल्ह्यातील सरसई गावात हजारोंच्या संख्येने वटवाघूळ असतात. वटवाघळांमुळेच हे गाव प्रसिद्ध झाले आहे.

येथील नागरिक शुभकार्याच्या आधी वटवाघळांची पुजा करतात व त्यानंतर कोणत्याही कार्याची सुरूवात करतात. येथे वाटवाघळं कधीपासून येतात, हे गावकऱ्यांच्या आता लक्षात देखील नाही.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, ज्या तलावाजवळ पिंपळाचे व अन्य झाड आहेत, येथेच अधिक वाटवाघूळ असतात. त्या तलावाची निर्माती सन 1402 मध्ये राजा शिव सिंह यांनी केली होती. येथे एक शिवालय देखील आहे. हा परिसर 50 एकरात पसरलेला आहे.

वैशालीप्रमाणेच बिहारच्या सुपौल जिल्ह्यात लहरनिया गावात देखील वाटवाघळांची पूजा केली जाते. येथे देखील हजारोंच्या संख्येने वटवाघूळ लटकलेले असतात. बिहारशिवाय छत्तीसगढच्या बुंदेली गावात देखील यांची पुजा केली जाते.

Leave a Comment