लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या प्रदूषणात घट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरी, याचे चांगले परिणाम देखील पाहण्यास मिळत आहे. याचा सर्वाधिक चांगला परिणाम पर्यावरणावर पाहण्यास मिळत आहे.

जगभरातील अनेक प्रदुषित शहरांमधील हवा आता स्वच्छ झाली आहे. यात राजधानी दिल्लीचा देखील समावेश आहे. दिल्लीतील हवा साफ करण्यासाठी पाण्याच्या फवारणीपासून ते ऑड-इव्हन फॉर्म्युला देखील वापरण्यात आला. मात्र काहीही परिणाम झाला नव्हता. आता लॉकडाऊनमुळे सर्व वाहने बंद असल्याने दिल्लीच्या प्रदूषणात घट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

एक महिन्यापुर्वी दिल्लीची एअर क्वॉलिटी धोकादायक होती. जी आज मॉड्रेड आणि गुड स्तरावर पोहचली आहे. Aqicn.org दिल्लीत अधिकत्म AQI 65 आगे, आणि न्यूतम 25 आहे.

दिल्लीची हवा स्वच्छ झाल्याने ट्विटरवर युजर हे एखाद्या स्वप्नासारखे असल्याचे सांगत आहेत.

https://twitter.com/Mahipal55776265/status/1243464313697972224

तर काही युजरने लिहिले की, गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच एअर क्वॉलिटी एवढी चांगली आहे.

एका युजरने लिहिले की, जे काम कोणालाच जमले नाही ते अखेर कोरोनाच्या भितीने झाले.

तर काहींनी घरात राहण्याचे काही चांगले परिणाम देखील आहेत, याची आठवण करून दिली.

Leave a Comment