अ‍ॅपलच्या दुर्मिळ बुटांची एवढ्या लाखांना झाली विक्री

टेक कंपनी अ‍ॅपल आपल्या डिव्हाईससाठी ओळखली जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या कंपनीने एकदा बुट देखील बनवले होते. या बुटांचा लिलाव करण्यात आला असून, अ‍ॅपलचे या खास बुट 16 हजार डॉलर्सना (11.2 लाख रुपये) खरेदी करण्यात आले आहेत.

80 च्या दशकात अ‍ॅपलने एक फॅशन लाइन लाँच केली होती. बुट देखील त्याचाच एक भाग होते. मात्र या बुटांना विक्रीसाठी कधीच बाजारात आणण्यात आले नाही. केवळ अ‍ॅपलच्या कर्मचाऱ्यांकडून प्रोटोटाईप म्हणून याचा वापर करण्यात आला होता.

विक्री करण्यात आलेल्या अ‍ॅपलच्या स्निकर्सची साइज 9.5 आहे. या बुटांना 1990 च्या सुरूवातीला खास कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आले होते. याआधी देखील 2018 मध्ये देखील अ‍ॅपल स्निकर्सची 30 हजार डॉलर्सला विक्री झाली होती.

Leave a Comment