असा कनेक्ट करा तुमच्या टिव्हीला लॅपटॉप, घ्या मोठ्या स्क्रीनचा आनंद

कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. सर्व लोक घरातच असल्याने आपल्या कुटुंबासोबत चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेत आहेत. स्मार्ट टिव्ही असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हिडीओ सहज पाहू शकता. मात्र जर तुमच्याकडे स्मार्ट टिव्ही नसला तरी तुम्ही लॅपटॉपला टिव्हीला कनेक्ट करून मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

लॅपटॉपला टिव्हीशी कनेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे एचडीएमआय केबल असणे आवश्यक आहे. या केबलद्वारे तुम्ही दोन्ही डिव्हाईसला कनेक्ट करू शकता.

हे दोन्ही डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी सर्वात प्रथम एचडीएमआय केबल कनेक्ट करा. यानंतर टिव्हीच्या रिमोटमधील इनपूट अथवा सोर्स बटन दाबा. एक यादी समोर येईल, ज्यातील एचडीएमआय 1 पर्याय निवडा. याद्वारे लॅपटॉप सहज टिव्हीशी कनेक्ट होईल.

जर टिव्हीवर लॅपटॉप स्क्रिनवर व्यस्थित दिसत नसेल तर लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनेलमध्ये जा. तेथे डिस्प्ले पर्यायावर क्लिक केल्यानंतर Adjust Resolution पर्याय निवडा. येथील पर्यायमध्ये टिव्ही पर्याय निवडा. ज्यानंतर लॅपटॉप स्क्रिनवर टिव्हीवर व्यवस्थित दिसेल.

Leave a Comment