जगभरातील जवळपास 195 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. अनेक शहर लॉकडाऊन करण्यात आली असून, भारतात देखील देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लोक घरात कैद आहेत.
सोशल डिसटेंसिंगमध्ये डेटिंग अॅपचा वापर वाढला
घरात कैद असल्याने लोक कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही गेमिंग आणि व्हिडीओ स्ट्रिमिंगचा आनंद घेत आहेत. काही कर्मचारी घरून काम देखील करत आहेत. मात्र काही जण असे आहेत, जे या काळात देखील ऑनलाईन डेटिंगचा आनंद घेत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात टिंडर अॅपच्या डाऊनलोडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, असे पहिल्यांदा झाले की एका आठवड्यात अमेरिकेत टिंडर अॅपच्या डाऊनलोडिंगमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र जागतिक स्तरावर यात 5 टक्क्यांनी घट देखील झाली.

टिंडरप्रमाणेच बंबल अॅपच्या डाऊनलोडिंगमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 12 ते 22 मार्च 2020 या काळात अमेरिकेच्या केवळ सिएटल शहरात या अॅपद्वारे पाठवणाऱ्या मेसेजमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय अॅपच्या व्हिडीओ कॉलिंगमध्ये देखील 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

डेटिंग अॅप्स व्यतिरिक्त फेसबुकच्या ट्रॅफिकमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. घरात कैद असलेले लोक फेसबुकचा जोरदार वापर करत आहेत. फेसबुक मेसेजिंगमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर व्हिडीओ कॉलिंग देखील वाढले आहेत. थोडक्यात, लोक व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिसटेंसिंग पाळत असले, तरी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत आहेत.