कोरोना : ही कंपनी जगभरातील आरोग्य संस्थांना मोफत देणार सायबर सुरक्षा

जगातील प्रमुख सिक्युरिटी सोल्युशन आणि सॉफ्टवेअर कंपनी बिटडिफेंडरने जगभरातील आरोग्य संस्थांना मोफत एंटरप्राइज ग्रेड सुरक्षा देणार असल्याची घोषणा केली आहे. याद्वारे बिटडिफेंडर कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एकप्रकारे मदत करेल. या काळात आरोग्य संस्थांना सायबर हल्ल्याचा धोका राहणार नाही.

एंटरप्राइज ग्रेड सिक्युरिटीद्वारे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या डाटा आणि रेकॉर्डच्या कॉम्प्युटर फाईलला नुकसान पोहचवणाऱ्या सॉफ्टवेअर आणि इतर सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे.

बिटडिफेंडरच्या एंटरप्राइज ग्रेड सिक्युरिटी अंतर्गत वेगवेगळ्या हायब्रिड क्लाउड डिप्लॉयमेंटचे काँबिनेशन हाताळण्यास सिंगल कंसोलचा वापर करता येईल.

बिटडिफेंडरचे सॉफ्टवेअर वारंवार करण्यात येणाऱ्या कामाला आपोआप वेगाने करण्यास सक्षम बनवेल. यामुळे आयटीचे काम सोपे होईल. आज 5 हजारांपेक्षा अधिक आरोग्य संस्थांमध्ये डाटा सुरक्षा आणि सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी बिटडिफेंडरच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

Leave a Comment