मोदींच्या कॅबिनेट मीटिंग मध्येही सोशल डीस्टन्सिंग


कारोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या कॅबिनेट मिटींग मध्येही सोशल डीस्टन्सिंगचा अवलंब केलेला दिसून आला. त्यासंदर्भातला व्हिडीओ एएनआय ने प्रसिद्ध केला आहे.

देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला त्याचबरोबर लोकानी सोशल डीस्टन्सिंग पाळावे म्हणजे एकमेकांपासून किमान १ मीटरचे अंतर ठेवावे असे आवाहन केले होते तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असेही आवाहन केले होते.

मोदींच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या गोष्टी आवर्जून पाळल्या गेल्या असे दिसून आले. बैठकीला उपस्थित मंत्र्यांच्या खुर्च्या एकमेकांपासून दूर ठेवलेल्या दिसल्या तसेच स्वतः मोदी घराबाहेर पडले नाहीत.

Leave a Comment