ट्रम्प यांनी जाहीर केले रिलीफ पॅकेज


फोटो सौजन्य पत्रिका
अमेरिकन डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पार्टीने अखेर करोनाग्रस्त अमेरिकेतील नागरिकांसाठी रिलीफ पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्यानुसार डोनल्ड ट्रम्प यांनी २ लाख कोटीचा हा निधी मंजूर केला आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या आर्थिक मदतीचे हे सर्वात मोठे पॅकेज असल्याचे सांगितले जात आहे. याचा उपयोग हेल्थ केअर, उद्योगव्यवसायातील कामगार वर्गाला सपोर्ट देण्यासाठी केला जाणार आहे.

या बेल आउट पॅकेजमधून सर्व नागरिकांना डायरेक्ट पेमेंटच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. त्यानुसार सर्व सज्ञान लोकांना १२०० डॉलर्स तर लहान मुलांना ५०० डॉलर्स दिले जाणार आहेत. छोटे उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी ३६७ अब्ज डॉलर्स दिले जात असून त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार देता येणार आहेत. मोठ्या उद्योगांना स्वस्त दराने कर्ज दिले जात आहे आणि हेल्थ केअर सिस्टीमसाठीही यातून पैसे पुरविले जाणार आहेत.

Leave a Comment