वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट पडू शकते का बंद?

कोरोना व्हायरसमुळे लोक घरात कैद आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी सध्या घरून काम करत आहेत. कर्मचारी घरून काम करत असल्याने इंटरनेवरील दबाव देखील अधिक वाढला आहे. लोक घरात कैद असल्याने स्ट्रिमिंग, गेमिंगचा आनंद घेत आहेत. याशिवाय शाळा आणि कॉलेज देखील व्हिडीओ कॉफ्रेंसिगद्वारे सुरू आहेत. पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेट पुर्णपणे समाप्त अथवा बंद होऊ शकते का ? असा प्रश्न निर्माण होतो.

इंडियन इंटरनेट प्रोव्हाईडर्सनुसार, जर मागणी अधिक वाढली तर नेटवर्क कार्यरत राहण्यासाठी वापर कमी करण्यासाठी काही पावले उचलली जातील. ऑफिस आणि कॉलेज ऑनलाईन कार्य करत असल्याने मागणी वाढली आहे. मात्र आतापर्यंत तरी मागणी पुर्ण करण्यास सक्षम आहे.

मागील आठवड्यापासून भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे. यात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच स्ट्रिमिंग व्हिडीओ आणि सर्वसाधारणपेक्षा अधिक डाटा वापरणाऱ्यांचा देखील समावेश आहे.

इंटरनेट हे बँडविथद्वारे संपत नाही. ते बँडविथवरून कार्यालयातून घरी स्थलांतर झाल्यानंतर ब्रोनाउंट्सकडे जाते. होम डाटा पाईप्स हे अचानक वाढणाऱ्या ऑनलाईन वापराला झेलण्यास सक्षम नसतात. याशिवाय अचानक वाढलेल्या वापरामुळे वर्क डाटा पाईप्स आणि वाय-फाय राउटर्स देखील परिणाम होतो.

मायक्रसॉफ्ट टिमचे दररोजच्या युजर्सची संख्या देखील 32 मिलियनवर 44 मिलियन झाली आहे. नेटफ्लिक्स आणि इतर भारतीय स्ट्रिमिंग सेवांनी देखील आपली बँडविथ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामने देखील आपल्या व्हिडीओचा बिट दर कमी केला आहे.

इंटरनेटच्या अधिक वापराचा परिणाम सर्वसाधारणपणे, तुमच्या बिल्डिंगमध्ये, आजुबाजूला अथवा तुमच्या भागात दिसू शकतो. त्याचा वेग देखील कमी होईल. मात्र जागतिक स्तरावर इंटरनेट कायम सुरू राहते.

तसेच, स्थानिक स्तरावार बँडविथची समस्या लवकर सुटणार नाही. कारण आयएसपी आणि बँडविथ देणाऱ्या टेक्निकल सेंटर्सवर कमी कर्मचारी कामास येत आहेत. इंटरनेटचा वाढता वापर तुमच्या होम राउटर्स, खाजगी नेटवर्क आणि स्थानिक इंटरनेट सेवेवर परिणाम करू शकतो. थोडक्यात इंटरनेटचा वेग काही प्रमाणात मंदावेल. थोडक्यात, महत्त्वाच्या साईट्सवर याचा परिणाम पाहण्यास मिळेल. या वेबसाईट हळू चालतील.

Leave a Comment