प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसबाबत ब्रिटनमधून मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटनच्या राजघराण्याच्या गादीचे वारस आणि राणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पुत्र 71 वर्षीय प्रिंस चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात राजघराण्याकडून माहिती देण्यात आली आहे.

राजघराण्याकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्या कोरोना व्हायरसची सौम्य लक्षण दिसत होते, मात्र तब्येत तशी स्थिर आहे. ते मागील काही दिवसांपासून घरूनच काम करत आहेत.

याशिवाय चार्ल्स यांच्या पत्नी द डचेस ऑफ क्रॉनवॉल यांची देखील तपासणी करण्यात आली आहे, मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिलिया हे स्कॉटलँड येथील घरी आयसोलेशनमध्ये आहेत.

मागील काही आठवड्यात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या भेटी घेतल्या मात्र व्हायरसची लागण कशी झाली, हे सांगता येणार नाही, असे राजघराण्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment