लॉकडाऊन : बिग बास्केटची सेवा आजपासून बंद

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा परिणाम ई-कॉमर्स साईट आणि ऑनलाईन ग्रोसरी देणाऱ्यांवर देखील होताना दिसत आहे. ऑनलाईन ग्रोसरी (किराणा सामान) देणारी कंपनी बिग बास्केटने देखील आपली सेवा तात्पुरती बंद केली आहे.

बिग बास्केटने आपल्या वेबसाईटवर सांगितले की, स्थानिक प्रशासनाने वस्तूंच्या वाहतुकीवर घातलेल्या निर्बंधामुळे आम्ही कार्यरत नाही. मात्र लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.

याशिवाय ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने देखील आपली सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बिग बास्कटने सोमवारी सांगितले की कंपनीने बंगळुरू येथील दूध डिलिव्हरी अ‍ॅप डेलीनिंजाचे 100 टक्के स्टेक खरेदी केले आहेत.

Leave a Comment