लॉकडाऊन दरम्यान बँकांच्या वेळेत बदल

कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या पार्श्वभुमीवर सरकारने 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊन असणार असल्याचे सांगितले आहे. यातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी, आयसीसी आणि कोटक महिंद्रा सारख्या बँकांनी आपल्या कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. बँकांनी कर्मचारी कमी केले आहेत, तसेच बँकेचा वेळ देखील कमी केला आहे. याशिवाय सोशल डिसटेंसिगसाठी ग्राहकांना इंटरनेट-मोबाईल बँकिंगचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

एचडीएफसी बँकेने 31 मार्चपर्यंत आपल्या सर्व ब्रँचचा वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत केला आहे. याशिवाय पासबूक अपडेट आणि परकीय चलन खरेदी सेवा देखील बंद केली आहे.

आयसीसी बँकने आपल्या ग्राहकांना मेसेज करत ऑनलाईन- मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या काळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याचे सांगितले आहे.

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या कार्यकारी वेळेत बदल केले नसले तरी, शाखेत कमी कर्मचारी असतील असे सांगितले आहे. याशिवाय ग्राहकांनी गरज असले तरच यावे, अन्यथा डिजिटल सेवांचा वापर करण्यास सांगितले आहे.

कोटक महिंद्राच्या शाखांचा कामकाजाचा वेळ देखील 31 मार्चपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत असेल. दरम्यान, पुढील 3 महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास, कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे देखील सरकारने सांगितले आहे.

Leave a Comment