खाकी वर्दीतल्या त्या देवदुतांचे अमरिंदर सिंह यांनी केले कौतूक

कोरोना व्हायरसमुळे सरकारने 21 दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा परिस्थितीत काहीजणांचे जेवणासाठी हाल होताना दिसत आहेत. अशातच पंजाब पोलिसांचा गरजूंना मदत करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी देखील पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन पोलीस कर्मचारी भाजी विक्रेत्याकडून टोमॅटो, कांदा, बटाटा आणि कोबी अशी सर्व भाजी घेतात व पैसे देण्याआधी सुरक्षेसाठी त्याच्या हातावर सॅनिटायझर देखील देतात.

यानंतर कर्मचारी भाजी घेऊन जीपमधून जातात व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या भागातील नागरिकांमध्ये ही भाजी वाटतात.

हा व्हिडीओ शेअर करताना अमरिंदर सिंह यांनी पंजाब पोलिसांचे कौतूक करताना लिहिले की, खूपच छान ! पंजाब पोलीस.

या व्हिडीओला आतापर्यंत 60 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, नेटकरी देखील पोलिसांचे या मदतीसाठी कौतूक करत आहेत.

Leave a Comment