वर्क फ्रॉम होममुळे मंदावला इंटरनेटचा वेग

भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता सरकारने अनेक शहर लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाजगी कंपन्यांमधील हजारो कर्मचारी घरून काम करत आहेत. घरून काम करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. मात्र लॉकडाउनमध्ये इंटरनेटचा स्पीड देखील कमी होत असल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्सनी या संदर्भात सोशल मीडियावर तक्रार केली आहे.

Image Credited – Amarujala

जनता कर्फ्यू दरम्यान फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील समस्या आली होती. डाउन डिटेक्टरनुसार, जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिट ते 5 वाजून 51 मिनिटांपर्यंत फेसबुक डाउन होते. यावेळी 60 टक्के लोकांना ब्लॅकाआउटचा सामना करावा लागला. 30 टक्के लोकांना लॉगिन समस्या तर 8 टक्के लोकांना फोटो-व्हिडीओ अपलोड करण्यास समस्या आली.

Image Credited – Amarujala

रिसर्च एजेंसी ऊकलानुसार, मार्चच्या सुरूवातीच्या आठवड्यातील भारतातील फिक्सड लाइन ब्रॉडबँडचा डाउनलोडिंग स्पीड चांगला होता. तर सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने, नेटफ्लिक्स सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग कंपन्यांना सांगितले आहे की, एचडी क्वॉलिटी व्हिडीओ दाखवणे काही दिवस बंद करून एसडी व्हिडीओ दाखवावे.

Image Credited – Amarujala

लोक घरात कैद असल्याने ऑनलाईन वेब सीरिज आणि गेम खेळण्याचा आनंद घेत आहेत. याचा परिणाम इंटरनेटवर होताना दिसत आहे. इंटरनेटवरील लोड वाढल्याने त्याचा स्पीड कमी झाला आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि ऑनलाईन गेमिंगमुळे इंटरनेट स्लो झाले आहे. मात्र सध्या केवळ भारतच नाही तर अनेक देश स्लो इंटरनेटच्या समस्येचा सामना करत आहेत.

Leave a Comment