फेक मेसेज तपासणे होणार सोपे, व्हॉट्सअ‍ॅप आणणार खास फीचर

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. मात्र या प्लॅटफॉर्मचा वापर फेक मेसेजसाठी देखील केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील हे फेक मेसेज रोखण्यासाठी सतत काम करत आहे. आता फेक मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरद्वारे यूजर्स अ‍ॅपमध्येच फॉरवर्ड मेसेजची सत्यता तपासू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचर्समध्ये यूजर्सला मॅग्निफाइंग ग्लासचा पर्याय मिळेल. यूजर्सला ज्या मेसेजची सत्यता जाणून घ्यायची आहे, त्यासाठी या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर युजर्ससमोर एक पॉप-अप येईल. ज्यावर या मेसेजला वेबवर सर्च करायचे आहे का ? असे विचारले असेल. यानंतर युजर्स गुगलवर त्या संबंधी माहिती सर्च करून, सत्यता पडताळू शकतात.

एका ट्विटर युजरने व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरबाबत माहिती दिली आहे. ट्विटनुसार, व्हॉट्सअ‍ॅप या फीचरचे टेस्टिंग करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर रोल आउट झाल्यानंतर युजर्सला मेसेज तपासण्यासाठी गुगलवर कॉपी-पेस्ट करावे लागणार नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप डिलीट मेसेज फीचरचे देखील टेस्टिंग करत आहे.

Leave a Comment