जिओ मोफत देणार 10Mbps चा स्पीड असणारे इंटरनेट

कोरोना व्हायरसमुळे सर्व शहर लॉकडाउन असून, लोक घरून काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटची गरज भासते. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन जिओने जिओ फायबर ब्रॉडबँड यूजर्ससाठी मोठी घोषणा केली आहे.

रिलायन्स जिओमार्फत #CoronaHaaregaIndiaJeetega अभियान चालवले जात आहे. याद्वारे लोकांना विना शुल्क इंटरनेटची बेसिक सुविधा देण्यात येईल. जिओने आपल्या ग्राहकांना 10एमबीपीएसपर्यंतचा वेग असलेले इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे.

खास गोष्ट म्हणजे यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेणार नाही. मात्र ही सेवा केवळ आधीपासून जिओ फायबर उपलब्ध असणाऱ्या भागातच मिळेल. जिओ 10एमबीपीएसपर्यंतची इंटरनेट सेवा मोफत देत असले तरी राउटरसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. कंपनीने सांगितले की, वाय-फाय राउटरसाठी 2,500 रुपये शुल्क घेतले जातील, ज्यातील 1,500 रुपये रिफंडेबल आहेत.

वाय-फायसाठी असलेले शुल्क देखील रिफंडेबल असेल. मोफत सेवा केवळ नवीन ग्राहकांसाठीच आहे. तर सध्याच्या ग्राहकांना कंपनीने डबल डाटा ऑफर देत आहे. डबल डाटा ऑफर सर्व ब्रॉडबँड प्लॅन मिळेल.

Leave a Comment