कलर ब्लाइंडनेस असणाऱ्यांना लवकरच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

कलर ब्लाइंडनेस (रंग आंधळेपणा) असणाऱ्यांना देखील आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. या संदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, एका खास सीमेपर्यंत म्हणजेच आंशिक कलर ब्लाइंडनेसच्या स्थितीमध्ये लायसन्स देण्यात येईल.

लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना आपण पुर्ण कलर ब्लाइंडनेस नसल्याचे देखील प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

मंत्रालयाच्या सुत्रांनुसार, या प्रकारचे लोक वाहन चालवण्यासंबंधी सर्व कामे सहज करू शकतात. त्यामुळे केवळ रंग ओळखू शकत नसल्याच्या आधारावर त्यांच्या इतर क्षमता नाकारता येणार नाही.

सरकारने या प्रकरणात वैद्यकीय तज्ञांशी चर्चा केली आहे व त्यानंतरच नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कलर ब्लाइंडनेस असणाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येत आहे. या संदर्भात 16 मार्चला अधिसूचना जारी करण्यात आली असून, लोकांकडून या संदर्भात सूचना मागवल्या आहेत.

Leave a Comment