व्हिडीओ : पित्याने टेडी बिअरमध्ये ऐकले मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके

आपल्या तरूण मुलाला गमवण्याचे दुःख त्या आई-वडिलांशिवाय कोणीच समजू शकत नाही. अमेरिकेच्या केडेकोटा येथील जॉन रीड यांच्या 16 वर्षीय मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एवढा भावूक करणारा आहे की, पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल.

जॉन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर शरीराला दफन करण्याऐवजी त्याचे अंग दान करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला नवीन जीवन मिळेल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना एक टेडी बिअर भेट म्हणून मिळाले.

हा टेडी बिअर त्या व्यक्तीने पाठवला होता, ज्या व्यक्तीच्या शरीरात जॉन यांच्या मृत मुलाचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते. आभार मानण्यासाठी त्याने टेडी बिअर भेट म्हणून पाठवला होता.

हा डेटी बिअर पाहून जॉन यांना रडूच कोसळले. कारण या टेडी बिअरमध्ये जॉन यांच्या मुलाच्या ह्रदयाचे ठोके  रेकॉर्ड करण्यात आलेले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॉन टेडी बिअर कानाला लावून आपल्या मुलाच्या ह्रदयाचे ठोके देखील ऐकतात.

जॉन सांगतात की, ते दररोज रात्री तासंतास टेडी बिअरला आपल्या छातीशी घेऊन मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकत असतात. जॉन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Leave a Comment