एवढ्या कोटींना विकली गेली ही मिनी बीच कार

1968 साली आलेल्या ‘द थॉमस क्राउन अफेयर’ चित्रपटात स्टिव्ह मॅक्विन यांच्याद्वारे चालवण्यात आलेल्या कारचा नुकताच फ्लोरिडा येथील अमेलिया बेटावर लिलाव पार पडला. या कारसाठी तब्बल 3 कोटींची बोली लागली. ही एक वॉक्सवेगन बीटलवर आधारित मिनी बीच कार आहे.

ड्यून बग्गी, द मेयर्स मॅनक्सचे एक मॉडेल आहे. हे मॉडेल 1960-70 च्या दशकात गोल्डन स्टेटचे निवासी ब्रूस मेयर्स यांनी कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात रेसिंगसाठी बनवले होते.

Image Credited – Amarujala

कॉम्पॅक्ट, ओपन एअर ऑटोमोटिव्हला वॉक्सवेगन बीटलच्या चेसिसला लहान करून डिझाईन करण्यात आले होते. मॅक्विनला द किंग ऑफ कूल नावाने देखील ओळखले जाते. मॅक्विन अशा छोट्या कारला कस्टमाइज करण्यात माहिर होते. मॅक्विन यांनी या कारला कस्टमाइज करण्यासाठी मोटर लेजेंड पेटे कोंडोसची मदत घेतली होती.

Image Credited – Amarujala

वॉक्सवेगन चेसिस असणाऱ्या या कारमध्ये कोर्वेअर इंजिन लावण्यात आलेले आहे व याचा बेस फायबरचा आहे. या कारचे वजन केवळ 1000 पाउंड आहे. कारमध्ये मोठे व्हिल, रुंद टायर आहेत, जे कारला खास बनवतात. याच्या 140बीएचपी पॉवर असणारे 2.7 लीटर एअर कूल्ड प्लेट 6 इंजिनला शेवोर्लेट कोर्वेअर इंजिनप्रमाणे मॉडिफाय करण्यात आलेले आहे. कारमध्ये 2 हँडब्रेक आहेत.

Image Credited – Amarujala

खास गोष्ट म्हणजे ही छोटी कार वाळवंटात देखील रेसिंगसाठी वापरता येते. या कारला 1968 साली आलेल्या ‘द थॉमस क्राउन अफेयर’ चित्रपटातील कारपासून प्रेरित असल्याचे समजले जाते.

Leave a Comment