लॉक डाउनमुळे कामावर जाऊ न शकणाऱ्या कंत्राटी कामगारांना मिळणार पगार

कोरोना व्हायरसमुळे अनेक शहर लॉक डाउन आहे. त्यामुळे सरकारी व खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी कामावर जाऊ शकत नाही. मात्र आता सरकारसाठी कार्य करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनासंबंधी अर्थ मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जे सरकारी कंत्राटी कामगार लॉक डाउनमुळे कामावर येऊ शकत नाही, अशा कर्मचाऱ्यांना ते काम असल्याचेच (ऑन ड्युटी) दर्शवले जाईल व त्यांना त्याचा पगार देखील दिला जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कार्यालयाने ट्विट करत सांगितले की, कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिसटेंसिंग आणि आयसोलेशनच्या उपायांमुळे भारत सरकारसाठी काम करणारे कंत्राटी कामगार आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांना कामावर येणे शक्य होणार नाही. मात्र अशा कर्मचाऱ्यांना कामावर असल्याचेच मानले जाईल व त्यांना पुर्ण वेतन दिले जाईल.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे अनेक शहर लॉक डाउन करण्यात आले असून, अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

Leave a Comment