रिलायंसचे कोविड १९ साठी पहिले खास हॉस्पिटल


फोटो सौजन्य हिंदी न्यूज
देशातील करोना विषाणूची वाढती लागण लक्षात घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीने मदतीचा हात पुढे केला आहे. देशातील पहिले कोविड १९ साठी समर्पित हॉस्पिटल कंपनीने सेव्हन हिल्स, मुंबई येथे सुरु केले आहे. यासाठी मुंबई महापालिकेचे सहकार्य मिळाले आहे. या हॉस्पिटल मध्ये करोना उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. त्यात व्हेंटिलेटर्स, पेस मेकर, डायलिसीस मशीन, पेशंट मॉनिटरिंग डिव्हायसेस, आयसोलेशन वॉर्डस यांचा समावेश आहे. १०० बेडसचे हे हॉस्पिटल आहे.

याचबरोबर कंपनीने फेसमास्कची उत्पादन क्षमता १ लाख मास्कवर नेली आहे. हेल्थ वर्कर्ससाठी वैयक्तिक प्रोटेक्टीव्ह उपकरणे, सूट, कपडे यांच्या उत्पादनावर काम सुरु केले आहे. करोनाग्रस्त रुग्णांची ने आण करणाऱ्या वाहनांना इंधन खर्च दिला जाणार आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते ११ या वेळात सर्व रिलायंस रिटेल स्टोर्स उघडी ठेवण्यात येणार आहेत. ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना रोजगार नसल्यास रिलायंस फौंडेशनतर्फे मोफत भोजन पुरविले जाणार आहे. यासाठी रिलायंस ग्रुपच्या सर्व कंपन्यांनी आपापली भूमिका पार पाडणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment