बंगाल क्रिकेट असो.ने दिले कोविड १९ साठी विमा कव्हर


फोटो सौजन्य एशियन एज
बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या ३२०० खेळाडू, स्टाफ मेम्बर्स साठी कोविड १९ विमा कव्हर दिले गेल्याचे सोमवारी जाहीर केले. सध्या कोणत्याच मॅचेस करोनामुळे खेळल्या जात नसल्याचे समजते. मात्र बंगाल क्रिकेट असोसिएशन पूर्वीपासूनच त्यांच्या स्टाफला विमा कव्हर देत होते त्यात यंदा कोविड १९ चा समावेश केला गेला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी ही माहिती दिली.

दालमिया म्हणाले, आमचे क्रिकेटर्स, अंपायर्स, स्कोअरर, आणि अन्य स्टाफ या सर्वाना करोना १९ विमा कव्हर दिले गेले असून ते सर्व या कव्हरमध्ये सामील असल्याचा भरवसा दिला गेला आहे. अर्थात सर्व स्टाफने करोना बचावासाठी सरकार आणि आरोग्यखात्याने जी नियमावली जारी केली आहे त्याचे काटेखोर पालन करावे असेही त्यांना सांगितले गेले आहे. या विमा कव्हरमध्ये महिला क्रिकेट खेळाडू आणि सिनियर टीम मधून खेळलेले माजी क्रिकेटर्ससुद्धा सामील आहेत.

बंगाल क्रिकेट असोसिएशनची स्वतःची मेडिकल कमिटी असून त्यांनी या विमा कव्हरसाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यासंदर्भात माहिती घेतली होती.

Leave a Comment