तिहारमधून ३ हजार कैदी होणार मुक्त


फोटो सौजन्य द हिंदू
दिल्लीत करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन तिहार मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने संक्रमण रोखण्यासाठी तुरुंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या तीन चार दिवसात ३ हजार कैद्यांना सोडले जाणार आहे. देशातील ५४८ जिल्हे लॉक डाऊन करण्यात आले आहेत आणि भारतातील करोना ग्रस्तांची संख्या ४०० वर पोहोचली असताना आणि ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

तुरुंग प्रशासन प्रमुख संदीप गोयल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, तुरुंगातून खतरनाक गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. १५०० कैद्यांना सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे त्याना पॅरोल किंवा फर्लोवर सोडले जाईल आणि कच्च्या कैदेत असलेल्या अन्य १५०० आरोपींना मोकळे केले जाईल अर्थात सोडण्याअगोदर त्यांच्याकडून जामीन घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तुरुंगात करोनाची लागण झाली तर त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होणार असल्याने तुरुंगातील गर्दी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment